हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेत आहे. आज (ता.15) ते नाशिक जिल्ह्यातील कांद्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी पीएम ज्यांच्या मतांसाठी सभा घेत आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी कांदा उत्पादकांनाच नोटिसा पाठवल्या, मग आम्ही शेतकऱ्यांनी मागण्या मांडायच्या कुणाकडे? असा सवाल शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी (Loksabha Election 2024) उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोष (Loksabha Election 2024)
गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. निर्यात खुली करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचा रोष असताना, आता पीएम नाशिक जिल्ह्यात सभा घेत आहेत. त्यामुळे याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी, लोकसभा निवडणुकीसाठी ते येत आहेत. मात्र, असे असताना याच शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. हे पदाधिकारी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडत असतात. मात्र, सभा होत असताना नोटिसा पाठवल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कांदा प्रश्नावरून लोकप्रतिनिधी, मंत्री यांना वेळोवेळी धारेवर धरण्यात येते. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सभा घेत असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही, कांदा उत्पादकांच्या समस्यांवर तोडगा नाही. म्हणूनच सरकारवर शेतकऱ्यांचा रोष आहे. हा रोष घालवण्यासाठी, शेतकऱ्यांना सरकारची ठोस भूमिका सांगण्यासाठी पीएम सभा घेत आहेत? मग शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा कशासाठी पाठवल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शेतकरी संघटनाना टार्गेट करणे चुकीचे
शेतकरी आंदोलन, शेतकरी संघटना टार्गेट करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. याआधीही अशाच प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या गेल्या. नगरच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर देखील अशाच प्रकारे अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. शेतकऱ्यांबाबतच्या चुकीच्या धोरणामुळे पीएमच्या मनामध्ये कुठेतरी अपराधीपणाची भावना असल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचे मत किसान सभेचे अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.