Onion Market Rate: कांद्याची आवक घटली! जाणून घ्या महत्त्वाच्या बाजार समितीतील कांद्याचे दर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कांद्यावरील (Onion Market Rate) निर्यातबंदी 31 मार्चनंतर देखील पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे कांदा दरात (Onion Market Rate) पुन्हा घसरण झाली.

सध्या राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली. मार्च एंडिंगमुळे आजच्या दिवसापर्यंत काही बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) लिलाव बंद असल्याने आवक कमी झाली आहे. काल दिवसभरात दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली होती. आज लाल कांद्याला सरासरी 950 रुपये ते 1530 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1400 रुपये दर मिळाला

आज 02 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यातील सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची सर्वाधिक 25 हजार 735 क्विंटल इतकी आवक झाली. त्या खालोखाल लोकल कांद्याची पुणे बाजार समितीत 13900 क्विंटल आवक झाली. तर नाशिक आणि राहता बाजार समितीत उन्हाळ कांद्याची अनुक्रमे 2950 क्विंटल आणि 1197 क्विंटल इतकी आवक झाली. एकट्या नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची 2000 क्विंटल आवक झाली.

आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1300 रुपये दर (Onion Market Rate)  मिळाला. पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. काही बाजार समित्यांमध्ये लोकल कांद्याला नऊशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून  ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये तर राहता बाजार समितीत 1200 रुपये दर (Onion Market Rate) मिळाला आहे.  

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.