PM Modi In Nashik : कांदा निर्यातदारांना वाहतुकीसाठी अनुदान, वाचा… नाशिकच्या सभेत काय म्हणाले मोदी!

PM Modi In Nashik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात खुली (PM Modi In Nashik) करण्यास परवानगी दिली असून, आता सुरळीतपणे वाहतूक सुरु आहे. केंद्र सरकार ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून संबंधित कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान देत आहे. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनविण्यात आला आहे, त्याचा येथील द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Nashik) यांनी म्हटले आहे.

पिंपळगाव येथे जाहीर सभा (PM Modi In Nashik)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी नाशिक जिल्हाच्या दौऱ्यावर होते. आज पिंपळगाव बसवंत येथे त्यांची ठिकाणी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो. भाजप सरकारने कांद्याचा बफर स्टॉक ठेवण्याचे काम केले. मागील वर्षी ७ लक्ष मेट्रिक टॅन कांदा खरेदी केला. यंदा पुन्हा 5 लाख मेट्रिक टॅन कांदा खरेदी करण्यावर भर दिला आहे. असेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

कांदा निर्यातीत 35 टक्के वाढ

मागील दहा वर्षांत 35 टक्के कांदा निर्यात वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी निर्यात खुली करण्यात आली. या दहा दिवसात 22 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे. सरकारच्या माध्यमातून ऑपरेशन ग्रीन सुरु करण्यात आला असून, त्यानुसार कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान दिले जात आहे. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनविण्यात आला आहे. त्याचा येथील द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

नेमकं काय म्हटलंय मोदींनी?

  • नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो.
  • सरकारने मागील वर्षी 7 लक्ष मेट्रिक टॅन कांदा खरेदी केला.
  • यंदा पुन्हा 5 लाख मेट्रिक टॅन कांदा खरेदी करण्यावर भर दिला आहे.
  • मागील दहा वर्षांत 35 टक्के कांदा निर्यात वाढली आहे..
  • दहा दिवसांपूर्वी निर्यात खुली करण्यात आली. या दहा दिवसात 22 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे.
  • ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून कांदा निर्यातदारांना वाहतुकीवर अनुदान दिले जात आहे.