विदर्भ भाजून निघतोय…! चंद्रपुरात कमाल 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद , पहा आज कसे असेल हवामान

Heat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये उन्हाची तीव्रता अधिकच वाढताना दिसून येत आहे. दरम्यान काल दिनांक 21 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे सर्वाधिक यावर्षीचे रेकॉर्डब्रेक करत 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर अकोला इथं 44.9 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याच्या नागपूर विभागाने ट्विटरद्वारे दिलेली आहे. 45. 2 दोन अंश सेल्सिअस म्हणजे यंदाच्या वर्षीचे हे राज्यातील रेकॉर्ड ब्रेक कमाल तापमान नोंदविण्यात आले आहेत. तर कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह काही भागांमध्ये काल गुरुवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. गुरुवारी पुण्यात ढगाळ वातावरण राहिले.

दरम्यान आज दिनांक 22 एप्रिल रोजी कोकणातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून उत्तर कोकणामध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या भागाचा समावेश असणार आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

विदर्भातील कमाल तापमान
दरम्यान गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी विदर्भ भागामध्ये नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढील प्रमाणे बुलढाणा 41.3, अकोला 44.9, अमरावती 44.2, वाशिम 43.5, यवतमाळ 40.3 ,वर्धा 44.2 ,नागपुर 43.2 ,चंद्रपूर 45 पॉईंट दोन, भंडारा 43.5, गोंदिया 44 अंश सेल्सिअस, गडचिरोली 42 अंश सेल्सियस.