‘नॉट रिचेबल’ विमा कंपन्यांनावर कारवाई करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने बहात्तर तासांच्या आत पीक विम्याची नोंदणीची मुदत दिली असताना काही विमा कंपन्यांनी मात्र आपल्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. मात्र कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये जागा बळकावून शेतकऱ्यांना काहीही सेवा न देणाऱ्या खासगी विमान कंपन्यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तडाखा दिला आहे. कृषी विभागातून … Read more

जनावरांमध्ये युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काय काळजी घ्याल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : युरियाचे विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते उदाहरणार्थ गाय-बैल, शेळी-मेंढी लहान वासरांचा रुमेन या पोटाच्या कप्प्याची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे युरियाची विषबाधा तुलनेने कमी होते. मात्र विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकतं. याची सर्वसाधारण कारणे व उपाय योजना यांची माहिती आजच्या लेखामध्ये घेऊयात. कारणे : युरियाचा वापर पशुखाद्यामध्ये … Read more

झणझणीत ‘किंग चिली’ थेट लंडनला रवाना ; पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला आनंद

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशातील अनेक शेती उत्पादने ही प्रदेशात निर्यात केली जातात. जगातील सर्वात तिखट असलेल्या मिरचीची निर्यात भारतातून लंडनच्या बाजारपेठेत करण्यात आली आहे. नागालँड मधील ‘किंग चिली’ किंवा ‘भूत जोलकिया’ अशी ओळख असलेली मिरची पहिल्यांदा लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करू आयाबाबत आनंद व्यक्त केला … Read more

इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनला उच्चतम भाव ; जाणून घ्या दर

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोबायीनच्या भावात कमालीची तेजी राहिली आहे. मंगळवारी सौद्यात सोयाबीनला ९ हजार ८५१ रुपये इतका उच्चतम कमाल भाव मिळाला. तर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी मात्र दहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे. सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा दहा हजाराचा भाव मिळाला आहे. दरात वाढ … Read more

केंद्र सरकार स्थापन करणार 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था कृषिमंत्री तोमर यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशात सुमारे दहा हजार शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करून त्यांना प्रोत्साहन देणारी योजना सुरू केली आहे. २०२७-२८पर्यंत सुमारे ६ हजार ८६५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून या दहा हजार शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. एक तालुका एक उत्पादन या शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करताना स्थानिक विशिष्ट … Read more

पुण्यासह ‘या’ भागात माध्यम ते तीव्र पावसाची शक्यता; 1 ऑगस्ट पर्यंत कशी असेल स्थिती जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशातच हवामान वैभागाने राज्यातील काही भागासाठी पावसाच्या बाबतीत यलो अलर्ट जरी केला आहे. पुढील ३ तासात नाशिक , पुणे या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता … Read more

लवकरच जमा होणार PM KISAN चा नववा हप्ता, केवळ हेच शेतकरी घेऊ शकणार लाभ, तपासा यादी

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पी एम किसान योजनेच्या खात्याशी जोडले गेलेल्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच देशातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा नववा हप्ता जमा होऊ शकतो. यापूर्वी अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकार अशा अपात्र शेतकऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल करून घेणार आहे. आणि आता या योजनेचा नववा हप्ता … Read more

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मसूर डाळीच्या किमतीत घट

हॅलो कृषी ऑनलाईन : वाढत्या महागाई दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासाची बातमी समोर येत आहे. शेतकरी बांधवांसाठीही ही आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारने मसूर विषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, त्याबद्दल जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण बातमी वाचा वस्तुतः केंद्र सरकारने मसूरवरील आयात शुल्क शून्य केले आहे आणि अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस 10 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यापूर्वी … Read more

जाणून घ्या खरीप ज्वारी लागवड आणि व्यवस्थापन

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या भारतामध्ये ज्वारी हे पीक खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. भारतामध्ये ज्वारीच्या संशोधनासाठी विविध कृषी विद्यापीठांमधून 9 केंद्राबरोबरच भारतीय कृषी संशोधन परिषदेची ज्वारी संशोधन संस्था हैदराबाद व आंतरराष्ट्रीय संस्था इक्रिसॅट हैदराबाद यासुद्धा कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात … Read more

मागील 3 वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; NCRB चा चिंताजनक अहवाल

हॅलो कृषी ऑनलाईन : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित झाला आहे. लोकसभा खासदार कृष्णपाल सिंह यादव यांनी केंद्र सरकारला गेल्या तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची संख्या जाहीर करावी, अशी मागणी केली होती. केंद्र सरकार शेतकरी आत्महत्येचं काही रेकॉर्ड ठेवते का? असं देखील विचारण्यात आलं होतं, त्यावर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी … Read more

error: Content is protected !!