फसवणुकीला बसणार आळा ; ग्राहकांना चाखायला मिळणार अस्सल हापूस आंब्याची चव , कृषी पणन मंडळाचा उपक्रम

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याची चाहूल लागली की ग्राहकांना आस लागते आंब्यांची… त्यातही अस्सल हापूस आंब्यांची चव चाखण्यासाठी ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र मार्केटमध्ये रत्नागिरी , देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणुक झाल्याचे पहायला मिळते. मात्र आता असे होणार नाही. कारण कृषी पणन मंडळाकडून थेट उत्पादक ते ग्राहक अशी साखळी करण्याचा प्रयत्न केला जातो … Read more

बनवेगिरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत ; जी आय मानांकन मिळालेल्या फळपिकाबाबत कृषिमंत्र्यांचा इशारा

Dada Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याची चाहूल लागली की , आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणातब बाजारात व्हायला सुरुवात होते. मात्र सध्या महाराष्ट्राच्या जी आय मानांकन मिळवलेल्या हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटकातील आंबा हापूस म्हणून मुंबईत विकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री तर लागतेच मात्र जी आय मानांकन मिळालेल्या फळांबाबत विश्वसार्हता देखील राहत नाही. … Read more

आंबा व डाळींबाच्या निर्यातक्षम बागेची नोंदणी करण्याचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी राज्यातुन युरोपियन युनियन आणि इतर देशामध्ये आंबा व डाळिंब निर्यातीसाठी अपेडाच्या सहकार्याने मॅगोनेट व अनारनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा व डाळिंब बाग नोंदणीचे काम सुरु असून 31 मार्च 2022 पर्यंत त्यास मुदतवाढ दिली आहे. तरी संबधित शेतक-यांनी आपल्या बागांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी यांनी केले … Read more

रत्नागिरीच्या आंबा उद्योगाला झळाळी ; 141 उद्योजकांना प्रक्रिया उद्योग उभारणीला दिली जाणार बळकटी

हॅलो कृषी ऑनलाईन : रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आता रत्नागिरीच्या आंबा उद्योगाला आणखी उभारी मिळणार आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निश्‍चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 141 प्रक्रिया उद्योजकांना लाभ दिला जाणार आहे. महत्वाचे मुद्दे –आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून सूक्ष्म खाद्य उद्योग … Read more

ढगाळ वातावरणामुळे कांदा, द्राक्ष, आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात दोन दिवसांपासून चांगलेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कांदा, द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चांगलेच धास्तावले आहेत. परंतु रविवारी दुपारनंतर पुन्हा अचानक आभाळ भरून आल्याने नगर जिल्ह्यात नेवासा, सांगलीत नेरले साताऱ्यातील वाळवा नाशिक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जोरदार वारे वाहून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी … Read more

अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा पिकावर मोठा परिणाम

Mango

हॅलो कृषी ऑनलाईन | गेल्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. १-२ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतो आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वरसह राजापूर, लांजा तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आता कोकणातील काजू आणि आंबा पिकावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. .दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते.

काल मुंबई आणि पुण्यासह कोकण विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. त्यामुळे हवेत उष्माही वाढला होता. दुपारी ३ वाजल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, विल्ये, पोचरी या भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाचा शिडकावा सुरूच होता. तर संगमेश्‍वर परिसरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. गुरुवारी दुपारी २ वाजल्यानंतर ठरावीक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुरंबी, सोनवडे, लोवले येथे पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. देवरूख परिसरात ढगाळ वातावरण असूनही पाऊस नव्हता. बुधवारी पहाटे देवरूख परिसरात पाऊस झाला होता. सलग पाच दिवस ढगाळ वातावरण होते.

Read more

लय भारी !! तब्बल ४०० झाडे लावून बाल्कनीत बनवली शेती

Joseph Francis

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतात जवळपास ७५% लोक शेती करतात. म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हंटले जाते. भारतात खूप कमी शेतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात . त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रश्न हा असतोच कधी जास्त पडतो तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतो . त्यामुळे कधी पिकातून पैसे मिळतात तर कधी नाही अशी … Read more

error: Content is protected !!