थंडी ओसरली… ! मुंबई ,पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशांच्या पार गेला. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी ओसरली आहे. आज दिनांक 19 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी दिनांक 18 रोजी उत्तर प्रदेशातील … Read more

राज्यात थंडी आणि ऊन संगटच…! सिंधुदुर्गात मात्र पावसाची हजेरी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अंशतः ढगाळ हवामान असलं तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी आता कमी झाली आहे. आज दिनांक 18 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान सोमवारी कोकनातील काही भाग आणि गोवा राज्यात पावसाने हजेरी … Read more

2021 मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक अनुभवला निसर्गाचा लहरीपणा , 340 जणांनी गमावले प्राण : IMDची माहिती

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2021 या वर्षात हवामानाचा सर्वाधिक विपरीत परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. मुख्यतः अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणे, चक्रीवादळ आणि शीतलहरींच्या घटनांमुळे 340 हून अधिक मृत्यू झाल्याचा दावा केला गेला आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे. मात्र दोन … Read more

तापमानात चढ -उतार ; विदर्भात आजही पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही भागात सकाळी धुके, दुपारी ढगाळ हवामान पहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 13 रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 7.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज दिनांक 14 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, उत्तर … Read more

राज्यात एकीकडे थंडी तर दुसरीकडे मेघगर्जनेसह पाऊस ; पहा आजचा हवामान अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रावर ही जाणवतो आहे. मागील काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी दिनांक 12 रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालय इथं नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले … Read more

सावधान…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी; पहा तुमच्या भागात कसे असेल हवामान

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. राज्यातल्या अनेक भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायत. विदर्भात मात्र अवकाळी पाऊस सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात थोडीशी वाढ होत मंगळवारी दिनांक (11) रोजी निफाड व नाशिक येथे नीचांकी (10) अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज दिनांक 12 रोजी मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट … Read more

राज्यात पुन्हा हुडहुडी… ! अनेक भागात एकअंकी तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यामध्ये अवकाळी पावसानंतर आता तापमान कमालीचे घसरले आहे. राज्यात पुन्हा एकदा एक अंकी तापमान नोंदविण्यात आले आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वात कमी 6.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान आज दिनांक (११) रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. खानदेशात रविवारी रात्री पारा घसरून … Read more

सतर्क राहा …! आज ‘या’ भागात वीज आणि वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अवकाळीचे संकट समोर येऊन ठाकले आहे. पुढील तीन – चार दिवस राज्यातल्या विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. मागील दोन दिवस राज्यातल्या काही भागात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक १० रोजी विदर्भ मराठवाड्यात जोरदार वारे मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात … Read more

9-11 जानेवारी राज्यातल्या ‘या’ भागात विजांसह ,गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकरी मित्रांनो , पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पांचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी होते आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आज दिनांक आठ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे … Read more

सतर्क रहा …! आज ‘या’ भागात जोरदार वारे ,मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४-५ दिवस काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे दिनांक ८,९ जानेवारी रोजी विदर्भातल्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. आज या’ भागात पाऊस आज दिनांक 7 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक … Read more

error: Content is protected !!