हुश्श…! राज्यात पावसाची उघडीप, पहा पुढील ५ दिवसांसाठी काय आहे हवामानाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. राज्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत मोठी जीवित हानी देखील झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मात्र आता एक दिलासादायक माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता उसंत घेईल असा अंदाज … Read more

Weather Uodate : ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका नाही…! जाणुन घ्या तुमच्या जिल्ह्याचा आहे का समावेश ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन तीन दिवसांकरिता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. Severe weather warnings issued by IMD for Maharashtra … Read more

पुढील २-३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, कोकण आणि मध्यमहाराष्ट्राला अलर्ट जारी

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन :  कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. काही लोकांच्या घरांमध्ये पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत आणखी दोन-तीन दिवस हवामान खात्याने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने 22 – 26 जुलै पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्राला दिला आहे. … Read more

राज्यात पावसाचा धुमाकूळ ; आजही ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणात जवळपास 10 ते 12 दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाआहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत. आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यात त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान … Read more

शेतकऱ्यांनो..! राज्यात आजही मुसळधार पाऊस ; पहा तुमच्या जिल्ह्यासाठी काय आहे हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र मुंबई कोकणासह राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे , सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला … Read more

कोकणात मुसळधार ; आणखी तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभागात धुवाधार पाऊस सुरू असून, तो विक्रमाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्य़ात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 20 Jul, Raigad पाउसExtremely heavy at isolated places … Read more

पुढील 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यातल्या अनेक भागात जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागनं राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अ‌ॅलर्ट … Read more

येत्या पाच दिवसात राज्यात पावसाचा इशारा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या पश्चिमेला असणार्‍या आरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनार पट्टीला बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

राज्यात पुढील ४८ तासांत पूर्वमोसमी बरसणार , ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मराठवाड्यासह इतर काही भागांमध्ये अवकाळीने दणका दिला आहे. आणखी काही दिवस अवकाळी पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दुपारपर्यंत कडक ऊन पडत आहे तर दुपारनंतर बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटून येत आहेत. तर रात्री उशिरा पाऊस हजेरी लावतो आहे. … Read more

error: Content is protected !!