Sapodilla Cultivation : चिकूच्या लागवडीसाठी कसं पाहिजे वातावरण? सुधारीत जाती कोणत्या?

Sapodilla Cultivation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वच जिल्यातील चिकूची लागवड (Sapodilla Cultivation) यशस्वी होऊ शकते. मूळच्या उष्ण प्रदेशातील ह्या फळाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. चिकूच्या पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलोरा गळतो, तसेच किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास झाडाची वाढ खुंटते. अशा वेळी लहान झाडांची विशेष काळजी घ्यावी … Read more

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन 7.5 टक्के घटण्याची शक्यता

Cotton Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा देशात सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली. परिणामी आता देशातील (Cotton Production) कापूस उत्पादनात 7.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर 0.48 टक्क्यांनी वाढून ते 58 हजार 620 रुपये प्रति कँडी (१ कँडी कापूस म्हणजे 356 किलो रुई) … Read more

Biological Pest Control : अशाप्रकारे करा जैविक कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण

Biological Pest Control

हॅलो कृषी ऑनलाईन । पिकावरील रोगांच्या अथवा किडींच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक, बुरशी, जिवाणू किंवा विषाणू यांचा उपयोग करणे यास जैविक नियंत्रण (Biological Pest Control) असे म्हणतात. कीटकनाशकामुळे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचतो. कीटकनाशके सतत वापरल्यामुळे किडींच्या शरीरात कीटकनाशकास प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे पिकांना परोपजीवी आणि उपयुक्त असणाऱ्या किडींचा नाश होतो आणि मग … Read more

Rice Production : तांदूळ- मका उत्पादनात घट होण्याची शक्यता

Rice Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात (२०२३-२४) देशातील तांदूळ उत्पादनात ३.७९ टक्क्यांनी घट (Rice Production) होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाकडून याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस कमी पडला त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पहायला मिळाला. उत्पादन कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार … Read more

Sugar Production : राज्यासह देशात यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२३-२४ ऊस गाळप हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ३३७ लाख टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामातील ३६६ लाख टनांपेक्षा कमी असणार आहे. अशी माहिती भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (इस्मा) देण्यात आली आहे. इस्माकडून नुकताच यावर्षीच्या साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाजित अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये म्हटले … Read more

खांडसरी साखर माहिती आहे का? 150 रुपये किलो दर, तुम्हीसुद्धा प्रक्रिया उद्योग उभारून कमवू शकता चांगले पैसे

खांडसरी साखर माहिती

Khandsari Sugar : खांडसरी साखरेत 94 ते 98 टक्के सुक्रोज असते. सध्या दोन प्रकारच्या खांडसरी कार्यान्वित आहेत. पहिला प्रकार म्हणजे परंपरागत खांडसरीचा; जेथे रस शुद्धीकरणासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर केला जातो. गूळ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून राब बनविले जाते व त्यापासून खांडसरी साखर तयार केली जाते. बाजारातील मालाच्या दराचे चढउतार व मागणी लक्षात … Read more

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

Crop Management

Crop Management : हरितक्रांतीनंतर कृषि उत्पादनात सुधारित तसेच संकरित बियाणे, रासायनिक खते, पीकसंरक्षके यांचा वापर खूप झपाट्याने वाढला हे सर्वज्ञात आहेच. असे जरी असले तरी कित्येक शेतकऱ्यांना सुधारित तंत्र म्हणजे काय व त्यासंबंधी माहिती अगर ज्ञान देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, कोठे आहेत याची माहिती नाही. कृषिसेवा केंद्र सुरू करणाऱ्या चालकास, युवकांना तर त्यांची माहिती असणे … Read more

Success Story : शेळीपालनातून कमावले 5 कोटी रुपयांचे उत्पन्न, तेजस लेंगरे यांची यशोगाथा

Success Story

Success Story : सांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर) येथील तेजस लेंगरे यांनी शेळीपालन व्यवसायातून पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांची यशोगाथा पाहूया. तेजस लेंगरे यांनी सन २००६ पासून शेळी पालन (Goat farm Business) सुरुवात केली. त्यांच्याकडे उस्मानाबादी जातीच्या ७ ते ८ शेळ्या होत्या. त्यामध्ये आफ्रिकन बोर जातीची एक शेळी आणि बोकड घेऊन शेळीपालनाला सुरुवात … Read more

Maharastra Rain । चिंताजनक बातमी! ‘या’ जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

Maharashtra Rain

Maharastra Rain । सध्या राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांना त्याच बरोबर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती तर अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे मोठा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान … Read more

मधमाशी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारी अनुदान कसं मिळवायचं? सरकार देतंय मोफत प्रशिक्षण अन मध खरेदीची हमी

Honey bee farming in Maharashtra

Honey bee farming in Maharashtra : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता : 1) वैयक्तिक … Read more

error: Content is protected !!